सध्याचे वैद्यक-शिक्षण आणि डॉक्टर विद्यार्थी
सध्याचे म्हणावे असे (भारतातील) वैद्यक शिक्षण मुळातून गेल्या वीस वर्षांत बदलले आहे अशातला काही भाग नाही. परंपरागत शिक्षणपद्धती राबवताना अत्याधुनिक उपकरणे बऱ्यापैकी वापरात आली असली तरी मेडिकल कॉलेजेसची परिस्थिती फारशी सुधारली आहे असे नाही. त्याच कालावधीत या कॉलेजेसमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षणीयरीत्या घटली आहे. वैद्यकशिक्षणावर ज्याचा विपरीत परिणाम होईल असा हा एक महत्त्वाचा घटक …